Fri, May 24, 2019 09:03होमपेज › Solapur › श्रीकांत डांगेसह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

श्रीकांत डांगेसह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:26PMसोलापूर : प्रतिनिधी

संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगेसह सुनील उर्फ अण्णा कोळेकर व शिवाजी वाघमोडे या तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल अमोल सोनकवडे या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.तिघा आरोेपींना स्नेहल यांच्या पतीने वीस लाख खंडणी न दिल्याने  चिडून एक कोटीची मागणी केली व जीवे ठार मारण्याची धमकी देत अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद दाखल झाली आहे.

12 जानेवारी रोजी किनारा हॉटेलसमोरुन स्नेहल सोनकवडे, मुलगा अराध्य सोनकवडे, जाऊ रेश्मा सोनकवडे व निर्मला वाले हे तिघे जात असताना श्रीकांत डांगे, अण्णा कोळेकर, शिवाजी वाघमोडे हे तिघे आले. तुझ्या पतीचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, तुम्ही मला एक कोटी रुपये नाही दिले तर तुमच्या पतीला जिवे ठार मारीन, अशी धमकी डांगे यांनी दिली. त्यावर स्नेहल सोनकवडे यांनी मी पैसे देणार नाही काय करायचे ते करा असे म्हणताच, आरोपींनी तुमच्या मुलाला सोडणार नाही, कधीही रात्री अपरात्री येऊन पैसे वसूल करु, अशी धमकीची भाषा वापरत अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. स्नेहल यांनी 100 नंबरला फोन करून पोलिस तक्रार करते, असे म्हणताच आरोपींनी पोलिस काहीही करू शकत नाहीत, असे उत्तरे दिली. घटना झाल्यापासून आरोपींच्या भीतीपोटी फिर्याद दाखल केली नसल्याची माहिती देण्यात आली. या घटनेची नोंद शनिवारी 5 मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त पाटील करीत आहेत.

Tags : Solapur, Introduce, atrophy,  triplets