Wed, Nov 14, 2018 16:44होमपेज › Solapur › इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात राबवू : देवेन्द्र फडणवीस

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात राबवू : देवेन्द्र फडणवीस

Published On: Jun 03 2018 4:44PM | Last Updated: Jun 03 2018 4:44PMलातूर : प्रतिनिधी

लातूरला पाणीदार बनवण्याचा उद्देश घेऊन लोकसहभागातून सुरू असलेले इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात राबवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रविवारी लातूर येथे केले.इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार डॉ सुनील गायकवाड, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुखमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 यावेळी मुख्यमंत्री म्हणाले नदीकाठी संस्कृती बहरल्या. पाणी हेच विकास व विनाशाचे कारण होते. जिथे पाणी होते तिथे विकास झाला व पाण्याअभावी विनाश झाला. हे सत्य आपण समजून घेऊन आपली भूमी जलयुक्त केली पाहीजे. जलयुक्त शिवारने राज्यातील 16 हजार गावे टँकर मुक्त झाली. आम्ही जलयुक्त शिवार केले संभाजीराव आता जलयुक्त करीत आहेत त्यामुळे ते खरे जलनायक आहेत.  रचनात्मक कार्य हेच समाजाला उपकारक असते. इंद्रप्रस्तच्या माध्यमातून होणारे काम येणाऱ्या पिढीला न्याय देणारे व इथल्या मातीला  सुजलाम सुफलाम करणारे असेल. त्यामुळे हे काम इतिहासात स्वर्णअक्षराने कोरले जाईल . समाजकारणाचे अधिस्थान लाभलेले हे कार्य नाव लातूर पॅटर्न साकारेल, असा विश्वास व्यक्‍त केला. संभाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकात अभियानामागची भूमिका सांगितली. लोकसहभागावर सुरू असलेले हे अभियान तीन वर्ष चालणार आहे. तीन हजारापेक्षा अधिक जलयोध्ये या उपक्रमाशी जोडले गेले असल्याचे सांगितले