Thu, Jul 18, 2019 02:34होमपेज › Solapur › भारतीय रेल्वेदेखील सोशल मीडियाच्या प्रेमात

भारतीय रेल्वेदेखील सोशल मीडियाच्या प्रेमात

Published On: Jul 30 2018 1:33AM | Last Updated: Jul 29 2018 10:51PMसोलापूर : इरफान शेख 

सोशल मीडियामधील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व ट्विटर हे मानवी जीवनाच्या अविभाज्य बाबी झाल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बंद असेल तर जीव कासाविस होऊ लागला आहे. रेल्वे प्रशासनानेदेखील सोशल मीडियाचा भरपूर उपयोग सुरू केला असून आता रेल्वेगाड्यांचे अपडेट किंवा माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेक माय ट्रीप या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. 

अनेक वेळा प्रवाशी ट्रेन चुकेल म्हणून घाईघाईनं रेल्वेस्थानकावर जातात. मात्र तिथे गेल्यावर माहीत होते की, ट्रेन अर्धा तास  किंवा तासभर उशिरा धावत आहे. रेल्वे उशिरा असल्याची माहिती प्राप्त झाल्याबरोबर अनेक प्रवाशी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करतात. रेल्वे प्रशासनाला दोष देण्यास सुरू करतात. यापूर्वी एक्स्प्रेस गाड्यांच्या माहितीसीठी अनेक प्रवाशी 139 ला फोन करून चौकशी करत होते.

प्रवाशांना होणारा हा मनस्ताप दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने प्रवाशांना एक चांगली सुविधा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ट्रेनचे अपडेट किंवा मेल एक्स्प्रेस गाड्यांची माहिती प्रवाशांना  व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. ही सुविधा मिळवण्यासाठी सर्वप्रथम प्रवाशांकडे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन  व्हर्जन अपडेट असणे आवश्यक व गरजेचे आहे. यापूर्वी ट्रेनची माहिती मिळविण्यासाठी अनेक प्रवासी 139 या क्रमांकावर फोन करायचे. 

प्रवाशांनी 7349389104 हा क्रमांक फोन मेमरीमध्ये सेव्ह करून व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रेनची माहिती घेऊन आपली समस्या दूर करू शकता.आपल्या मोबाईलमधील जतन (सेव्ह) केलेल्या नंबरवर ट्रेनचा  क्रमांक पाठवावा लागेल. मेसेज यशस्वीरित्या डिलिव्हर होताच मेल एक्स्प्रेस गाड्यांची माहिती मिळेल. भारतीय रेल्वेने यासंबंधित ‘मेक माय ट्रीप’सोबत भागीदारी केली आहे.

मेक माय ट्रीप ही भारतीय कंपनी असून 2000 मध्ये अमेरिकेत याची स्थापना झाली होती. 2005 मध्ये या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले कामकाज सुरू केले. याचे मुख्यालय हरियाणा  राज्यातील  गुरुग्राम (गुडगाव) येथे आहे. या कंपनीकडून ऑनलाईन तिकीट बुकींग, हॉलिडे पॅकेज, हॉटेल बुकींग, रेल्वे व बस तिकीट बुकींग आदी प्रकारची सेवा या कंपनीकडून दिली जाते. भारतीय रेल्वेबरोबर करार झाल्याने या कंपनीकडून प्रवाशांची सोय होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय रेल्वे प्रवाशांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.