Sun, Feb 24, 2019 11:28होमपेज › Solapur › भारतीय बौद्ध महासभेने केली विठ्ठलासमोर बुद्धवंदना

भारतीय बौद्ध महासभेने केली विठ्ठलासमोर बुद्धवंदना

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:04PMपंढरपूर : प्रतिनिधी 

पंढरपूर येथील दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पंढरीत श्रीविठ्ठल मंदिरात विठ्ठलासमोर बुद्धवंदना केली. ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, अबालवृद्धांना सुख-शांती व समृद्धी तसेच उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी केली. 

अशी माहिती बुुद्धिष्ट सोसायटीचे पंढरपूर शहराध्यक्ष सूरज हरिबा पोळके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन, आषाढ पौर्णिमा धम्मदिनी वर्षावास निमित्ताने श्रीविठ्ठल मंदिरामध्ये  विठ्ठलासमोर देशातील उपासक, उपासिका तसेच अबालवृद्ध नागरिकांना सुख-शांती-समृद्धी, उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मंगलमैत्री भावनेने जिल्हाध्यक्ष दीपक आठवले यांच्यासह सर्वांनी बुुद्धवंदना समर्पित केली. ही बुुद्धवंदना तब्बल 22 मिनिटे चालली. यावेळी त्रिसरण पंचशीलही घेतले.