Tue, Nov 13, 2018 06:30



होमपेज › Solapur › संवादातून विद्यापीठ विकासाला बळ देऊ : प्र कुलगुरु 

संवादातून विद्यापीठ विकासाला बळ देऊ : प्र कुलगुरु 

Published On: Dec 10 2017 2:34PM | Last Updated: Dec 10 2017 2:34PM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक संकुलांसह समाजात परस्परांतील संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद अधिक दृढ करुन सोलापूर विद्यापीठ विकासाला बळ देऊ, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी केले. सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु म्हणून डॉ. करमाळकर यांनी रविवारी दुपारी पदभार घेतला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, माजी कुलगुरु डॉ. एन.एन. मालदार, कुलसचिव गणेश मंझा, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, उपस्थित होते.
डॉ. करमाळकर पुढे म्हणाले की, ‘‘विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मालदार यांनी आजपर्यंत चांगले काम केले आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक संदर्भात विद्यापीठाचा आलेख चढता आहे. पुणे विद्यापीठातील चांगले उपक्रम सोलापूर विद्यापीठात राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्याना फायदा होईल.’’ 

डॉ. करमाळकर म्‍हणाले, ‘‘पुणे विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठात परस्पर सहकार्याचे काही करारही करण्याचा मानस आहे. नवीन कुलगुरु निवडीची प्रक्रिया होईपर्यंत किमान चार महिन्याचा वेळ लागेल. या कालावधित विद्यापीठाचे कामकाज विनाअडथळा गतीने होईल. पुणे विद्यापीठाचा कामाचा व्याप मोठा आहे. असे असले तरी मी आठवड्यातून किमान एक दिवस सोलापूर विद्यापीठाच्या कामांसाठी देणार आहे. त्यामुळे कामकाजात खंड पडणार नाही.’’