Fri, Jan 18, 2019 03:53होमपेज › Solapur › धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने शिक्षा

धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने शिक्षा

Published On: Mar 02 2018 12:50AM | Last Updated: Mar 01 2018 10:48PMमाढा : वार्ताहर

माढ्यातील सन्मती पतसंस्थेला कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी रंगनाथ कृष्णा रणदिवे यांना माढा न्यायालयाने तीन महिन्यांची साधी कैद व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

रणदिवेवाडी येथील रंगनाथ कृष्णा रणदिवे यांनी माढ्यातील सन्मती पतसंस्थेकडून 2005 मध्ये स्वतःसाठी व जामिनदारांसाठी 93 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये कर्जाचे हप्ते भरताना स्वतःच्या व जामिनदाराच्या कर्जापोटी 88700 रूपयांचा धनादेश संस्थेस दिला होता. तो धनादेश त्यांच्या खात्यावर पैसे नसल्याने न वटता परत आला. त्यावेळी संस्थेने त्यांना खात्यात पैसे जमा करण्यासाठी सांगितले. तरीही पैसे न भरल्याने  संस्थेतर्फे भारत जनार्धन टिंगरे यांनी माढा फौजदारी न्यायालयात कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणाची न्यायालयासमोर सुनावणी होऊन फिर्याद शाबित झाल्याने माढ्याचे फौजदारी न्यायाधीश सिद्धार्थ गोडबोले यांनी दोषी ठरवून तीन महिन्यांची साधी कैदेची शिक्षा सुनावली.

आरोपीने फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून एक लाख रूपये एक महिन्याच्या आत द्यावेत, ते न दिल्यास आरोपीस तीन महिन्यांची साधी कैद देण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.संस्थेकडून अ‍ॅड. सुदेश कुर्डे यांनी काम पाहिले.