Tue, Apr 23, 2019 18:17होमपेज › Solapur › अवैध दारू विक्रीप्रकरणी माढ्यातील तीन हॉटेलवर कारवाई

अवैध दारू विक्रीप्रकरणी माढ्यातील तीन हॉटेलवर कारवाई

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 12:02AMमाढा : वार्ताहर 

माढा येथील तीन हॉटेलवर अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी बार्शी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करत 28 हजार 322 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधितांवर माढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा शहरातील हॉटेल सम्राट येथून 17 हजार 582 रु. किंमतीचा, हॉटेल साई येथून 3 हजार 600 रु. किंमतीचा व हॉटेल केसरी येथून 7 हजार 140 रु. किंमतीचा असा एकूण 28 हजार 322 रुपये किंमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माढा पोलिसांत संतोष कुंडलिक साठे, सुनील नवनाथ मारकड, रामचंद्र प्रकाश चौगुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या कारवाईत बार्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक बोधनापोड, पो.हे.कॉ. देवकर, पो.हे.कॉ. दासरी, पो.कॉ. पाडुळे, पो. कॉ. जर्‍हाड यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पो. कॉ. शिवाजी सावंत हे करीत आहेत.

Tags : solapur, Illegal liquor sale case, Three hotels action,  Madha area,