Thu, Sep 20, 2018 00:00होमपेज › Solapur › शासन निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन : शिवाजी शिंदे

शासन निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन : शिवाजी शिंदे

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:39PMपंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील 36 माथाडींचे विलिनीकरण करण्याच्या विरोधात पंढरपूर येथील माथाडी कामगारांनी एकत्र येत मंगळवार दि. 30  रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविला. निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिला आहे.

तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या 4 सप्टेंबर 2016 च्या व 30 जानेवारी 2018 चा शासन निर्णय क्र. यु. डब्ल्यूए/2018/प्र. क्र. 1/ कामगार -5 या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिवाजी शिंदे म्हणाले की,  सध्याचे शासन हे राज्यातील 36 हमाली माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे.  शासनाने 4 सप्टेंबर 2016 व 17 जानेवारी 2018 च्या शासन निर्णय त्वरित मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा  इशारा देण्यात आला आहे. या मोर्चास सोलापूर जिल्हा वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश भोसले यांनी पाठिंबा दिला. यावेळी अध्यक्ष मारुती बंदपट्टे, उपाध्यक्ष सुरेश खटके, विष्णु शेंडे, संतोष सावंत, बाळासाहेब घोडके, उत्तरेश्‍वर गोफणे, श्रीमंत डांगे, नागा घाडगे, सिध्देश्‍वर घाडगे, सोमनाथ मोरे, नितीन शिंदे, उत्तरेश्‍वर जाधव, विठ्ठल कोळी, विलास जाधव, सुरेश गांडुळे, अर्जुन खरात, राजेंद्र पवार, सुभाष जाधव आदीसह हमाल व तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.