Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Solapur › आयटीआय प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

आयटीआय प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

बाजारभावाप्रमाणे वस्तूंची खरेदी न करता जास्त दराने खरेदी करून शासनाला 3 लाख 64 हजार 103 रुपयांना फसविल्याप्रकरणी आयटीआयच्या प्राचार्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राचार्य व्ही. जे. कांबळे (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. याबाबत सुरेंद्र दत्तात्रय शिंदे (वय 52, रा. घर नं, 14/1, गौरव अपार्टमेंट, रेल्वेलाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सोलापूर-विजापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्राचार्य व्ही. जे. कांबळे हे  सन 2013 ते 2015 या कालावधीत कार्यरत होते. सन 2013 ते 2015 या कालावधीतील आयटीआयचे लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये 2013 ते 2015 या कालावधीत प्राचार्य कांबळे यांनी जास्त रकमेने 17 लाख 52 हजार 423 रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली. 

प्राचार्य कांबळे यांनी खरेदी केलेल्या वस्तूंची  किंमत बाजारभावाप्रमाणे 13 लाख 88 हजार 399 रुपये इतके होणे अपेक्षित होते; परंतु प्राचार्य कांबळे यांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी करून शासनाचे 3 लाख 64 हजार 103 रुपये इतक्या किंमतीचे नुकसान केले म्हणून 10 नोव्हेंबर 2017 रोजी पुणे येथील प्रादेशिक कार्यालयातील सहायक संचालक आर. एस. घुमे यांच्या आदेशानुसार प्राचार्य कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.