Tue, Apr 23, 2019 08:26होमपेज › Solapur › वाखरीतील 4 अंगणवाड्या ठरल्या आय.एस.ओ.

वाखरीतील 4 अंगणवाड्या ठरल्या आय.एस.ओ.

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:31PMपंढरपूर : प्रतिनिधी

वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील 4 अंगणवाड्यांना आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. या अंगणवाड्यांना नुकतेच पंचायत समितीच्यावतीने प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दरम्यान वाखरीतील राजीवनगर अंगणवाडी कुपोषणमुक्त अंगणवाडी ठरली आहे. 

वाखरी येथील अंगणवाडी क्रमांक 1, अंगणवाडी क्रमांक 2, स्वामी विवेकानंद नगर आणि राजीवनगर या चार अंगणवाड्या आय.एस.ओ. ठरल्या आहेत. या चारही अंगणवाड्यांना आय.एस.ओ. मानांकन प्राप्तीसाठी आवश्यक निकष पुर्तीसाठी ग्रामपंचायतीने मोठे आर्थिक सहकार्य केले आहे. अंगणवाडीत रंग रंगोटी, चित्रे काढणे, वॉश बेसीनसह अन्य आवश्यक बाबींसाठी ग्रामपंचायतीने प्रत्येकी सुमारे 20 हजार रूपये खर्च केले आहेत. त्यामुळे या अंगणवाडी केंद्रांना आय.एस.ओ. मानांकनाचे निकष पूर्ण करता आले. 

गादेगाव बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. आर.के. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या चारही अंगणवाड्यांनी आय.एस.ओ. मानांकनाचे निकष पूर्ण केले. त्याबद्दल  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रजनीताई देशमुख, तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे, उपसभापती अरूण घोलप, गटविकास अधिकारी  ज्ञानप्रकाश  घुगे, बालविकास प्रकल्पाधिकारी  एन. एळपाटे, सरपंच सौ. मथुरा मदने, उपसरपंच सौ. कोमल मदने, ग्रामविकास अधिकारी अरविंद कुंभार यांनी सर्व अंगणवाडी सेविकांचे अभिनंदन केले. तालुका पंचायत समितीच्यावतीने नुकताच आय.एस.ओ. प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

ग्रामपंचायतीने केलेल्या सहकार्यामुळेच गावातील चार अंगणवाड्या एकाच वेळी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्या असून याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. 

Tags : pandhrpur Wakhri,  I S O Rating,  Anganwadi