Thu, Aug 22, 2019 13:14होमपेज › Solapur › प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:48PMकरकंब : वार्ताहर

आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने फास देऊन खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. जळोली (ता. पंढरपूर) येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या सुरेश मच्छिंद्र काळे असे मृताचे नाव असून, या प्रकरणी सुरेश याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघांविरोधात करकंब पोलिसांत खून आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

जळोली येथील सुरेश काळे याने शनिवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर त्याचा मुलगा राहुल काळे यांनी करकंब पोलिस ठाण्यात दिली होती. शवविच्छेदन अहवालावरून सुरेश काळे याने आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सुरुवातीस मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी  

अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र नंतर मयताचा भाऊ मोहन काळे यांनी फिर्याद दिली असून यामध्ये मयताची पत्नी तनुजा सुरेश काळे व नागनाथ गोरख शिंदे यांचे अनैतिक संबंध असून त्यास सुरेश काळे अडथळा निर्माण करत असल्याचा राग मनात धरून तनुजा सुरेश काळे, नागनाथ गोरख शिंदे व नागनाथ अशोक मिसाळ (सर्व रा. जळोली ता. पंढरपूर) यांनी मिळून सुरेश काळे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. मात्र गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 या तिन्ही आरोपी विरुद्ध भादवि कलम, व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती करीत आहेत.  तनुजा सुरेश काळे हिस पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या शोधत पोलिस पथक पाठविले आहे.