होमपेज › Solapur › शारीरिक व मानसिक तक्रारींवर केलेले उपचार म्हणजे होमिओपॅथी

शारीरिक व मानसिक तक्रारींवर केलेले उपचार म्हणजे होमिओपॅथी

Published On: Apr 09 2018 10:57PM | Last Updated: Apr 09 2018 10:49PMसोलापूर ः प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या युगात मानवी शरीराला मोठ्या समस्यांची घरघर लागली आहे.होमिओपॅथी उपचार पध्दती अशी पध्दत आहे की ज्यामध्ये रुग्णाच्या मानसिक व शारीरिक तक्रारींंची सांगड घालून औषधोपचार केला जातो. रुग्णाची मानसिकता होमिओपॅथी आजाराचा मुख्य आधार असल्याची  माहिती डॉ.शेंडे यांनी दिली.

होमिओपॅथीशास्त्राचे जनक डॉ.सॅम्युअल हानिमन यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील होमिओपॅथी डॉक्टर दरवर्षी वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतात.डॉ. सॅम्युअल हानिमन या जर्मन शास्त्रज्ञाचा जन्म 10 एप्रिल 1755 ला झाला होता. यांनी अ‍ॅलोपॅथीमध्ये पदव्युत्तर (एमडी) शिक्षण घेतले होते.सुरुवातील काही वर्ष अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस केल्यानंतर हे लक्षात आले की, यामध्ये आजार हा पूर्णपणे बरा होत नसून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वर्ग होतो. यामुळे डॉ.हानिमन यांनी अ‍ॅलोपॅथी क्षेत्र सोडले व आजार पूर्णपणे बरा करता येईल अशा शास्त्राकडे वळले. त्यातूनच मलेरिया आजाराचा शोध घेत असताना त्यांनी होमिओपॅथी  या  शास्त्राचा शोध लावला.

हे शास्त्र समचिकित्सा या नियमानुसार चालते. होमिओपॅथी ही उपचार पध्दती करताना डॉक्टर रुग्णाचे मानसिक व शारीरिक दोन्ही तक्रारींची सांगड घालून उपचार करतात.होमिओपॅथी औषधे तयार करताना निरोगी माणसांवर वापरली जातात.त्यामुळे त्या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. होमिओपॅथी उपचार अधिक विश्‍वासदर्शक असल्याची माहिती होमिओपॅथी डॉक्टरांनी दिली.

होमिओपॅथी उपचार करताना अचूक औषधे दिल्यास रुग्ण जलदगतीने बरा होतो. नवीन दाखल होत असलेल्या आजारांवरसुध्दा होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहेत. रुग्णाच्या मानसिकतेवर औषधोपचार केला जातो.
                      - डॉ. विश्‍वनाथ शेंडे, होमिओपॅथी डॉक्टर

Tags : Homeopathy, physical, mental complaints, World Homeopathy Day