Sun, Aug 18, 2019 20:34होमपेज › Solapur › शरद प्रतिष्ठानने केली फसव्या सरकारच्या आदेशांची होळी

शरद प्रतिष्ठानने केली फसव्या सरकारच्या आदेशांची होळी

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:39PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा, धनगर आरक्षणाबाबत चालढकल, शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी, जी.एस.टी.सारख्या जाचक प्रणालीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. याचाच एक भाग म्हणून शरद प्रतिष्ठानच्या वतीने शासनाच्या आदेशाची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

शासनाच्या विरोधात बोंब ठोकून शासनास जागे करण्यासाठी  गुरसाळे-टेंभुर्णी रस्ता (ता. पंढरपूर) येथे होळी सण अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला असून, शासनाच्या वतीने सातत्याने अन्यायी धोरणे राबविण्यात येत आहेत. या धोरणांच्या निषेधार्थ वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करुन देखील शासनास जाग येत नसल्याने आज येथील ग्रामस्थ व शरद प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांच्या प्रतींची प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करण्याबरोबरच शासनाविरोधात बोंब ठोकली.

यावेळी गणेशगोडसे, बालाजी खंदारे, पोपट चव्हाण, सोमा ढवण, नाना खरतडे, सोमा जाधव, दीपक कवडे, राहुल पवार, सुखदेव भोसले, बालाजी पवार, दीपक माने, प्रशांत पवार, नवा वाघमारे, शिवाजी चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.