Fri, Jan 18, 2019 00:38होमपेज › Solapur › बार्शी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

बार्शी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 10:46PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. सलग पाचव्या दिवशी अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

उक्‍कडगाव येथे शेतकर्‍याच्या घरावर वीज कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. वादळामुळे बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील ममदापूर येथे उभ्या व काढून टाकण्यात आलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पांगरी भागासह ग्रामीण भागात रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला आहे. पहाटेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. 

जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या  ममदापूर शिवारातील चंद्रकांत मुळे, पोपट घोडके, अंकुश घोडके, यशवंत ओमण, माणिक घोडके, उद्धव घोडके (मेजर), प्रशांत घोडके, उद्धव मुळे आदी शेतकर्‍यांच्या कांदा पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांनी कांदा काढून टाकलेला होता, तर काहींचा कांदा  शेवटच्या टप्प्यात आलेला होता. कांद्यात पाणी शिरल्याने कांदा नासतो.

बुधवारी पहाटे अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे द्राक्ष बागा, काढून टाकलेली ज्वारी, गहू तसेच कांदा पिकांना याची हाची पोचली आहे. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Tags : solapur, Barshi, Barshi news, Heavy rain,