Tue, Jan 22, 2019 14:38
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्याला वादळी वार्‍यासह पावसाने झोडपले

पंढरपूर तालुक्याला वादळी वार्‍यासह पावसाने झोडपले

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 11 2018 12:13AMपंढरपूर : प्रतिनिधी

तालुक्याच्या उत्तर भागातील तुंग, करकंब परिसरात गुुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेती पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर टोलनाक्याजवळ भोसलेवस्ती येथे झाड पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गावकर्‍यांनी झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

गुरुवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांनी टाळले होते.  सायंकाळी 5 वाजता अचानक आकाशात ढग निर्माण होऊ लागले. तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या तुंगत व करकंब येथे सायंकाळी सहा वाजता  वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. तुंगत येथे अर्धा तास गारांचा पाऊस झाल्याने मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तुंगत येथे पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर भोसले वस्ती येथे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर करकंब परिसरातही झालेल्या पावसाचे सखल भागात  पाणी साचले होते. पावसात काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत. तालुक्यात इतर ठिकाणी मात्र पाऊस झाला नाही.