Tue, Mar 19, 2019 15:57होमपेज › Solapur › हार्दिक जोशी, अक्षरा देवधर समर्थांच्या चरणी नतमस्तक

हार्दिक जोशी, अक्षरा देवधर समर्थांच्या चरणी नतमस्तक

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:59PM

बुकमार्क करा
अक्कलकोट : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या रसिकांवर भुरळ घातलेल्या व सध्या प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेल्या छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील ‘राणा’ या भूमिकेतील हार्दिक जोशी, ‘अंजली पाठक’ यांच्या भूमिकेतील अक्षरा देवधर व सहकलाकारांनी नुकतीच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 

याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा ‘श्रीं’चे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी या मालिकेतील ‘आबासाहेब’ यांच्या भूमिकेतील मिलिंद दासपाते, ‘बरकत’ या भूमिकेतील अमोल नाईक, प्रोड्यूसर रवी गावडे, धर्मण्णा सादूल, उद्योगपती राजकुमार राठी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्‍वस्त विलासराव फुटाणे, दयानंद हिरेमठ, दीपक जरीपटके, नरसिंग क्षीरसागर, ऋषीकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, अनंत क्षीरसागर, महेश काटकर, मोहन जाधव, सागर गोंडाळ, संतोष पराणे व नागरिक आणि स्वामीभक्त उपस्थित होते.