Sun, Aug 25, 2019 08:06होमपेज › Solapur › रोजगारासाठी आरमार सरसावली

रोजगारासाठी आरमार सरसावली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

दिव्यांगबांधवांनी सरकारी मदतीच्या कुबड्यांवर विसंबून न राहता सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांचे जीवनमान सुधारावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राष्ट्र उभारणीच्या कार्यात दिव्यागांचा सहभाग असावा या हेतूने संभाजी आरमार कार्यरत आहे. तसाच एक भाग म्हणून पात्रतेनुसार दिव्यांगबांधवांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी संभाजी आरमाने हा उपक्रम आयोजित केला. 

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभाग केंद्र सरकारच्या अंतर्गत दिव्यांगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण नोंदणी संभाजी आरमार दिव्यांग संघटनेमार्फत सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत समाजकल्याण केंद्र, रंगभवन, सोलापूर येथे सोलापूर महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे- पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त सुनील माने, नगररचना अधिकारी विजय राठोड, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणे येथील प्रोजेक्ट असोसिएट मनोज कुलकर्णी, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, रिक्षा संघटना प्रमुख संतोष कदम, दिव्यांग संघटनाप्रमुख बाबुलाल फणीबंद, न्यू एज कॉम्प्युटर्सचे संचालक शैलेश थिगळे, शहरातील असंख्य दिव्यांगबांधवांच्या उपस्थितीत पार पडली.

शहरातील दिव्यांगांच्या पाठीशी संभाजी आरमार खंबरपणे उभी असून महानगरपालिकेच्या एकूण निधीतून तीन टक्के दिव्यांगांसाठीच्या निधीसाठी संघटना चांगला पाठपुरावा करत असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांच्या विविध समस्या सोडविणे, व्यावसायिक प्रशिक्षणासारखे उपक्रम राबविणे असे चांगले काम करत आहेत, असे मत मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी व्यक्त केले व तसेच मनोज कुलकर्णी यांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी टी.व्ही. टेक्निशियन, मोबाईल रिपेअर, असिस्टंट हेअर स्टायलिस्ट, ब्युटी थेरपीस्ट असे दोन महिन्यांचे कोर्स व रुपये पाच हजार विद्यावेतन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असून न्यू एज कॉम्प्युटर्स सोलापूर येथे जास्तीत जास्त दिव्यांगबांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी संभाजी आरमारी भरीव कामगिरी करत असून सगळ्या दिव्यांगबांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन अनंतराव नीळ यांनी केले व आभार सुधाकर करणकोट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण मोरे, प्रशांत गायकवाड, नागेश चोपडे, सोमनाथ मस्के, अक्षय अच्युगटला यांनी प्रयत्न केले.

Tags ; Solapur, Solapur News, Handicap, improve, normal people, relying,  government hawkers


  •