Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Solapur › तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक : डॉ. हमीद दाभोळकर  

तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक : डॉ. हमीद दाभोळकर  

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 8:19PMपंढरपूर : प्रतिनिधी  

माणसाला आनंदी, सुखी, आणि समृद्ध जीवन जगायचे असेल तर विवेकवाद हवा. जगातील तरुण मोठे वैज्ञानिक होतात. पण  त्याच्यासारखे मोठे वैज्ञानिक होण्यासाठी  भारतातील शिक्षण व्यवस्था वैज्ञानिक झाली पाहिजे. असे प्रतिपादन महाराष्ट्र विवेक वाहिनीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान, विवेकवाद आणि समाज या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 
हमीद दाभोळकर पुढे म्हणाले की, अंनिस देव धर्मा विरुद्ध नाही तर देव धर्माच्या नावाखाली शोषण करणार्‍यांच्या विरुद्ध असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य सीताराम गोसावी म्हणाले की, प्रत्येक व्यक्‍तीने विवेकाचा वापर करून  कृती करणे आवश्यक आहे.  यातूनच चांगला विवेकवाद निर्माण होईल . यावेळी प्रा. बी. जे. तोडकरी, एन. एन. तंटक, डॉ. एम. टी. बचुटे, डॉ.  एस. व्ही. पाटील, डॉ. विकास कदम, प्रा. उमेश साळुंखे, सुधाकर काशीद, धर्मराज चवरे, शहाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.