Sat, Jun 06, 2020 10:45होमपेज › Solapur › निलमनगरात दीड लाखांची घरफोडी

निलमनगरात दीड लाखांची घरफोडी

Published On: Dec 13 2017 1:44AM | Last Updated: Dec 12 2017 10:49PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

तेलंगणा येथे साखरपुड्यासाठी गेलेल्या तरुणाचे निलमनगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्‍कम व सोन्याचा ऐवज असा 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडीची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत सिद्धराम अपण्णा उप्पलवार (वय 29, रा. निलमनगर भाग 3, शरण मठाजवळ, सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धराम उप्पलवार यांच्या लहान भावाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते.  उप्पलवार हे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास परत घरी आले. त्यावेळी  त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने उप्पलवार यांच्या घरातून लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख रक्‍कम  असा 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे तपास करीत आहेत.

मारहाण करून 1 लाख 37 हजारांचा ऐवज घेणार्‍यांवर गुन्हा
तरुणास मारहाण करुन त्याच्या व त्याच्या मित्राच्या गळ्यातील 1 लाख 37 हजार 500 रुपये किंंमतीचे सोन्याचा ऐवज जबरदस्तीने काढून घेणार्‍या 7 जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागनाथ मरिगंगा कंटीकर (वय 25, रा. घोंगडे वस्ती, हायनाळकर हॉटेलजवळ, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन जावेद शेख, तरबेज अ. रहिम सगरी, इन्नुस अजमुद्दीन शेख व इतर 3-4 साथीदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ कंटीकर व त्याचा मित्र हे दोघे सोमवारी संगम नगर रिक्षा स्टॉपसमोरुन दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी रिक्षा चालकास रिक्षा रोडच्या बाजूला घ्या, असे सांगितले असता चिडून जाऊन रिक्षाचालक असलेल्या जावेद शेख व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करुन लाकडाने, दगडाने मारहाण करुन कंटीकर व मित्र बिपीन पाटील याच्या गळ्यातील व हातातील 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. 

म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वाबळे तपास करीत आहेत.