Sat, Sep 22, 2018 14:47होमपेज › Solapur › विद्यार्थ्यांनी पेपरचे फोटो, झेरॉक्सही काढले (video)

विद्यार्थ्यांनी पेपरचे फोटो, झेरॉक्सही काढले (video)

Published On: Feb 21 2018 6:33PM | Last Updated: Feb 21 2018 6:33PMसोलापूर : प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी येथे बारावी परीक्षेचा पहिलाच  इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. यानंतर एक क्लिप व्हायरल झाली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि त्याच्या झेरॉक्सही काढल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये झेरॉक्स सेंटरवर ही प्रश्नपत्रिका कुठुन आली. कोणी दिली याचे संभाषण दिले आहे. 

मुलांनी शाळेत जाऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि त्याचे झेरॉक्स काढले असल्याचा खुलासा या व्हिडिओत केला आहे. ‘आम्ही त्या मुलांनी आणलेल्या फोटोंचे झेरॉक्स काढल्याचे झेरॉक्स सेंटरच्या मालकांनी सांगितले. इंग्रजी विषयाच्या पेपरच्या पहिल्या दोन पानांची झेरॉक्स काढले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भातंबरे (ता.बार्शी, जि. सोलापूर)  येथे आज सकाळी बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला होता. पेपर सुरु झाल्‍यानंतर व्हॉट्सॲपवरुन ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती.