Mon, Jan 21, 2019 09:08होमपेज › Solapur › सोलापूर : बार्शी येथे बारावीचा पेपर फुटला

सोलापूर : बार्शी येथे बारावीचा पेपर फुटला

Published On: Feb 21 2018 2:37PM | Last Updated: Feb 21 2018 3:14PMबार्शी तालुका : प्रतिनिधी 

भातंबरे (ता.बार्शी, जि. सोलापूर)  येथे बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला आहे. पेपर सुरु झाल्‍यानंतर व्हॉट्सॲपवरुन ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची चर्चा आहे.

बार्शी तालुक्यातील भातंबरे गावातील तांबेवाडी तांडा येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचा पेपर फुटल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. पेपर सुरु झाल्‍यानंर एका तासातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर फिरली. 

या प्रकारामुळे शिक्षण खात्याचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्‍यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. 

आजपासून संपूर्ण राज्‍यात बाराविच्या परीक्षेला सुरुवात झाली. यंदा राज्‍यभरातून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेत होणाऱ्या कॉपीसारख्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.