Thu, Apr 25, 2019 05:49होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांकडून प्रश्‍न सोडविणार : पालकमंत्री विजयकुमार देशमुख

मुख्यमंत्र्यांकडून प्रश्‍न सोडविणार : पालकमंत्री विजयकुमार देशमुख

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

दै. पुढारीचे कार्यकारी संपादक व पत्रकारावर चुकीच्या पध्दतीने दाखल  केलेले प्रकरण हे मुख्यमंत्र्यांकडून सोडविण्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास दिली.

पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेची बातमी प्रसिध्द केल्याने दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक व क्राईम रिपोर्टर अमोल व्यवहारे  यांच्याविरोधात गुन्हे शाखेच्या  पोलिस  उपायुक्त  पौर्णिमा  चौगुले यांनी शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल  करण्यात  आले  आहेत. त्याच्या निषेधार्थ  सोलापूर  श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन त्यांना  निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्याशी  मोबाईलवरून  बोलून  माहिती घेतली व योग्य त्या सूचना दिल्या. 

यावेळी ना. देशमुख यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली व यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलून यावर मुख्यमंत्र्यांकडूनच तोडगा काढू, असे सांगितले. 
यावेळी  ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये, दै. पुढारीचे व्यवस्थापक हेमंत चौधरी, सोलापूर  पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष केत, उमेश कदम, प्रशांत माने, राजकुमार नरोटे, चंद्रकांत मिराखोर, सरदार अत्तार, अरूण रोटे, संतोष आचलारे, दीपक देशपांडे, तात्यासाहेब पवार, रोहन नंदाणे, राजकुमार माने, इरफान शेख, रामकृष्ण लांबतुरे, सुमित वाघमोडे, धनंजय मोरे, विजय आवटे, संजय येऊलकर यांच्यासह विविध दैनिक व वृत्तवाहिनीमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार सुरक्षा समितीतर्फे निवेदन
सोलापुरातील दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक व पत्रकार अमोल व्यवहारे यांनी पोलिस खात्यामधील गुन्हे शाखेच्या बाबतीत बातमी लावली होती. त्या बातमीचा राग मनात ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर दाखल करण्यात आलेला गुन्हा ताबडतोब पाठीमागे  घेण्यात यावा, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीवतीने पोलिस आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली
याप्रसंगी जिल्हा प्रभारी अध्यक्ष म्हणाले की, सोलापूर शहरात दारू, मटका, जुगार, विषारी शिंदी व  बेकायदेशीर वाळू उपसा यासारखे बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत. प्रामाणिक पत्रकारावर बातमी लावली म्हणून गुन्हे दाखल करण्यात येत असतील, तर पत्रकार सुरक्षा समितीवतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा संघटक मोहसीन कोतकुंडे, सहसचिव खिजर पगडीवाले, शहर संघटक विकास आमटेकर, संपर्क प्रमुख शफी चितापुरे, दामोदर पासकंटी, मल्लिनाथ साखरेमोल, यासीन शेख, दत्ता फाळके, विष्णू सुरवसे, दादासाहेब जाधव, अजय खांडेकर, सूर्यकिरण भोसले, प्रशांत चव्हाण, प्रभाकर एडके, नितीन कांबळे, सुभाष म्हेत्रे, संजय जाबा आदी उपस्थित होते.