Tue, Mar 26, 2019 02:00होमपेज › Solapur › द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन तर ऊस उत्पादकांना बुरे दिन

द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन तर ऊस उत्पादकांना बुरे दिन

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 17 2018 11:30PMकरकंब : वार्ताहर

या वर्षी द्राक्षांना 60 रुपये व बेदाण्याला 300 रुपये उच्चांकी दर मिळाला तर ऊसाला शेवटी 1600  ते 1800 रुपयांवर शेतकर्‍यांना समाधान मानावे लागले, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आले असून ऊस उत्पादकांना बुरे दिन आले आहेत. चार पाच वर्षांपूर्वी पाऊस कमी झाल्याने  तालुक्यातील फळबागांचे प्रमाण कमी होऊन भाजीपाला व इतर पिकांकडे शेतकरी वळले होते. सततच्या दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी व बारमाही पीक घेण्यासाठी बहुतांश शेतकर्‍यांनी लहान मोठी शेततळी बांधून पाणीसाठा करून ठेवला आहे, द्राक्ष व डाळिंबच आपल्याला हमखास उत्पन्न देऊ शकते याची खात्री तालुक्यातील शेतकर्‍यांना झाल्याने त्यांनी द्राक्ष व डाळिंब लागवड करण्यास सुरुवात केली आहे. किमान अर्धाएकर तरी द्राक्ष बाग असावी अशी मानसिकता शेतकर्‍यांची झाली असून तालुक्यात 2 वर्षात द्राक्ष लागवड वाढली आहे. 

यावर्षी द्राक्षेला 60 रुपये किलो पर्यंत दर मिळाला व बेदाण्यास 150 रुपये किलो पासून 300 रुपये किलो पर्यंत दर मिळाला, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळाले. तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत. 2500 ते 3000 रुपये टनाला दर मिळेल असे सुरुवातीस वाटत असताना साखर कारखाने बंद होण्यापूर्वी साखरेचे दर कमी झाल्याने काही साखर कारखान्याने 1600 रुपयेच  अंतिम दर दिला तर काही कारखान्यांनी ऊस नेहून दोन तीन महिने झाले तरी अद्याप एक रुपयाही दिला नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.