Mon, Jul 22, 2019 03:34होमपेज › Solapur › आर्थिकदृष्ट्या मागास सर्वच विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफीचे शासनाचे परिपत्रक 

आर्थिकदृष्ट्या मागास सर्वच विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफीचे शासनाचे परिपत्रक 

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 12:51AMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीमुळे सरकारने कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास सर्वच विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी 50 टक्के शुल्क माफीचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. परंतु अद्याप अनेक शाळा, महाविद्यालयांकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आला आहे.

सर्व समाजातील ईबीसी धारकांना आवाहन करण्यात येते की, उच्च तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी, कृषी महाविद्यालय, आर्टस, कॉमर्स, विज्ञानसह सर्वच शाखा, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक आदी सर्व ठिकाणी प्रवेश घेताना 50 टक्के शुल्क माफीच्या शासन परिपत्रकानुसारच शुल्क भरावे. सर्व शाळा, महाविद्यालयांनी सहकार्य करुन पालकांच्या रोषाला जाण्याचे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु व जिल्हाधिकारी यांनाही यासंदर्भात अंमलबजावणीसाठीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, रवी मोहिते, दत्ता मुळे, प्रियंका डोंगरे, भाऊ रोडगे, राम जाधव, चव्हाण सर, सोमनाथ राऊत आदी उपस्थित होते.