Sat, Nov 17, 2018 16:34होमपेज › Solapur › गोडावून पेटवून दिल्याने २२ लाखांचे नुकसान

गोडावून पेटवून दिल्याने २२ लाखांचे नुकसान

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:36PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जोडभावी पेठेतील राजयोग हाईटस् येथील सविता एंटरप्रायजेस या गोडावूनमध्ये स्फोटक द्रव टाकून तो पेटवून दिल्याने गोडावूनमधील 22 लाख 40 हजारांचा माल जळून खाक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राघवेंद्र चंद्रकांत पवार (वय 35, रा. नवी पेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. राघवेंद्र पवार यांचे राजयोग हाईटस् येथे सविता एंटरप्रायजेस नावाचे गोडावून आले. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञाताने स्फोटक द्रव पवार यांच्या गोडावूनच्या शटरच्या दरवाजा व खिडकीतून आतमध्ये ओतून  आग लावून निघून गेला. त्यामुळे 22 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. पोलिस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.