Fri, Aug 23, 2019 23:13होमपेज › Solapur › राईनपाडा हत्याकांड पिडीतांना शासकीय मदत तातडीने द्या : मोहिते- पाटील

राईनपाडा हत्याकांड पिडीतांना शासकीय मदत तातडीने द्या : मोहिते- पाटील

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:12PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

पीडित कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे त्यांचा जगण्याचा आधार हरवला आहे. आता शासकीय स्तरावर असलेली सर्व ती मदत तातडीने दया, अशा सुचना खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याना दिल्या.

धराईनपाडा हत्याकांडात मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाड़ी येथील नाथपंथी डवरी समाजाच्या  4 भिक्षुकाना प्राण गमवावे लागले. या बाबत माढा मतदार संघाचे खा. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी गुरुवारी खवे येथे भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खा. मोहिते-पाटील बोलत होते.

यावेळी भोसले कुटुंबियांनी शासनाकडून घोषित आर्थिक मदत मिळाली नसल्याचे सांगितले. म्हणून मयत व्यक्तीच्या अस्थी विसर्जित न करण्याचा निर्णय सांगताच खा. विजयसिंह मोहिते- पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याना  दूरध्वनीवरून संपर्क करत पीड़ित कुटुंबांना तात्काळ मदत करा अशी सुचना केली. यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्येक कुटुंबास रु. दहा लाख आणि कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी निश्‍चित असल्याचे सांगीतले.

यावेळी  राष्ट्रवादीचे  प्रांतिक सदस्य राहुल शहा, तालुकाध्यक्ष सुनील डोके, शहराध्यक्ष अजित जगताप, उपाध्यक्ष विजय बुरकुल, उपाध्यक्ष भारत पाटील, जिल्हा चिटणीस भारत बेदरे, माजी अध्यक्ष सोमनाथ माळी,  तानाजी खरात, प्रवीण खवतोड़े, बशीर बागवान, रामेश्‍वर मासाळ सह मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.