Mon, Apr 22, 2019 22:16होमपेज › Solapur › करकंब येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

करकंब येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:36PMकरकंब : वार्ताहर

घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत करकंब (ता. पंढरपूर) येथील धनंजय घाटुळे यांचे छपराचे घर जळून भस्मसात झाल्याने  सुमारे चार लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, घाटुळे वस्तीवर धनंजय घाटुळे हे त्यांचा एक विवाहित भाऊ व बायको-मुलांसोबत राहतात.  सोमवारी सायंकाळी घरातील महिलांनी गॅसवर भात शिजायला
 ठेवून बाहेरची कामे करत असताना अचानक गॅसचा स्फोट होवून छपराच्या घराला आग लागली. याबाबत तातडीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अग्नीशामक गाडी बोलावून घेण्यात आली. मात्र सदर गाडी रस्त्याअभावी मोडनिंब रोडवरुन आत जावू शकली नाही. शिवाय तोपर्यंत संपूर्ण घर, घरातील संसारोपयोगी भांडी, कपडे, धान्य व शेती उपयोगी साहित्य असा जवळपास चार लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला होता. शिवाय घराजवळच बांधलेली म्हैस जखमी झाली होती.