Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Solapur › लोटेवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा; ९ ताब्यात 

लोटेवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा; ९ ताब्यात 

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 10:53PMसोलापूर : प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून 9 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्‍कम, वाहने असा 3 लाख 28 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत  सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश दाजी कोळेबाग, विष्णू ऊर्फ पिंटू सुभाष जाधव, बंडू पोपट कारंडे, शरद जालिंदर बोडरे, आबा नामदेव कारंडे (रा. लोटेवाडी, ता. सांगोला), मंजूर अब्दुल मुजावर, गणेश महादेव देशमुख (रा. पिलीव, ता. माळशिरस), सुनील बंडू एलपले (रा. अजनाळे, ता. सांगोला), शकूर लतीफ तांबोळी (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना लोटेवाडी  येथील  सातारकर वस्तीजवळील ओढ्याजवळ सरकारी जागेत काही लोक जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या विशेष पथकाला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या विशेष पथकाने लोटेवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी वरील सर्वजण जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्‍कम, वाहने असा  3  लाख 28 हजार 620 रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, हवालदार मनोहर माने, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे आदींनी केली.