Tue, Sep 25, 2018 16:28होमपेज › Solapur › गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना(Video)

गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना(Video)

Published On: Jul 18 2018 6:38PM | Last Updated: Jul 18 2018 6:38PMसोलापूर : प्रतिनिधी

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यातील सर्वात लांबून येणाऱ्या संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीने आज (बुधवारी) सोलापूरचा मुक्काम संपवून पंढरीकडे प्रस्थान केले. 

गजानन महाराजांच्या पालखीने सोमवारी सकाळी सोलापूर शहरात प्रवेश केला होता. महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पालखीचे स्वागत केले. प्रभाकर महाराज मठात विसावा घेत दुपारी पालखीने कुचन हायस्कूल कडे प्रस्थान केले. कुचन हायस्कूल मध्ये मुक्काम केल्यानंतर काल, मंगळवारी सात रस्ता परिसरातील उपलप मंगल कार्यालयात पालखीचे आगमन झाले.

यावेळी पालखीवर १५ फुट उंचीवर कागदी विमानाच्या प्रतिकृतीतून पुष्पवृष्टी करुन  स्वागत करण्यात आले होते.  दुपारपर्यंत  नाभीक समाजाच्या वतीन वारकऱ्यांची मोफत दाढी कटींग करण्यात आली. आज, बुधवार सकाळी नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांच्याकडून वारकऱ्यांना साबण, टूथपेस्ट, टूथब्रश आदी. साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखीने  पंढरीकडे प्रस्थान केले.