Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Solapur › पंचायत समिती सभागृहास गाडगेबाबांचे नाव देण्याचा ठराव मंजूर

पंचायत समिती सभागृहास गाडगेबाबांचे नाव देण्याचा ठराव मंजूर

Published On: Jan 07 2018 9:28PM | Last Updated: Jan 07 2018 9:28PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

तालुका पंचायत समितीच्या सभागृहास राष्ट्रसंत गाडगेबाबा असे  नामकरण करण्यात आले असून तशा प्रकारचा ठराव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत शनिवारी करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तालुका पंचायत समितीच्या सभागृहास कोणतेही नाव दिलेले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर भाळवणी पंचायत समिती गणाचे सदस्य आणि शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी शिंदे यांनी या सभागृहास राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती.

मासिक बैठकीत त्यांनी तशा प्रकारची सुचना मांडली होती. या सुचनेला गुरसाळे पं.स.गणाचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी अनुमोदन देऊन ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. यासंदर्भात बोलताना संभाजी शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश संपुर्ण देशाला दिला. त्यांच्या त्याच स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी आज देशभर होत आहे. अशा थोर महापुरूषाचे नाव पंचायत समितीच्या सभागृहास द्यावे अशी मागणी केली होती. ती मंजूर करण्यात येऊन सभागृहाचे नामरकरण झाले आहे. दरम्यान पंचायत समितीच्या या नामकरणाचे शहर आणि तालुक्यातून स्वागत होत आहे.