Thu, May 23, 2019 21:05
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › १ व २ जुलै पात्र शाळांसाठी ६५ कोटीची तरतूद  : आमदार सावंत

१ व २ जुलै पात्र शाळांसाठी ६५ कोटीची तरतूद  : आमदार सावंत

Published On: Apr 18 2018 7:24AM | Last Updated: Apr 18 2018 7:24AMकरकंब : भीमा व्यवहारे

राज्यातील कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या शाळा व तुकड्यांचा कायम शब्द काढून त्याचे मुल्यांकन करण्यात आले होते, त्यापैकी दि  १ व २ जुलै पात्र झालेल्या शाळांसाठी ६५ कोटीची तरतूद करण्याचा निर्णय काल (मंगळवार दि.१७) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.

शिक्षण व्यवस्थेच्या चक्रव्यूहात गेली १५ ते १६ वर्षे अडकलेले राज्यातील हजारो शिक्षक विना वेतन सेवा करीत आहेत. दि १ व २ जुलै २०१६ पात्र शाळा व तुकड्यांना २० टक्के अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत  व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने सातत्याने पाठपुरावा करून शासनास  ६५ कोटीची तरतूद भाग पाडले.

एप्रिल २०१८ पासून मार्च २०१९ पर्यंत पात्र शाळेतील ८९७० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी ६४ कोटी ९८ लाख ६०हजार रुपये इतकी तरतूद करण्याचा निर्णय काल (मंगळवार दि.१७) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags : Education, School, Grant, Non grant, Government, Fund, Minister Tawade MLA Sawant,