Thu, Jul 18, 2019 04:12होमपेज › Solapur › तत्कालीन मुख्याधिकारी टेंगले शरण 

तत्कालीन मुख्याधिकारी टेंगले शरण 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:42PMतुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापुरातील बहुचर्चित यात्रा अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगले सोमवारी तुळजापूर पोलिस ठाण्यात स्वत:हून शरण आले. तुळजाभवानी यात्राकालावधीत शहरात भाविकांच्या सोयी, शहर स्वच्छता यासह विविध कामांसाठी शासनाकडून पालिकेस प्रतिवर्षी अनुदान प्राप्त होते. त्यातूनच यात्रा कालावधीत विविध कामे केली जातात. या अनुदानातील 1 कोटी 62 लाख रुपयांच्या यात्रा अनुदान घोटाळ्यात मुख्य आरोपींपैकी एक असलेले तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगले हे तुळजापूर पोलिसांना शरण आले. तुळजापूर पोलिसांनी त्याना अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे वर्षभरापासून ते फरार होते. तब्बल 1 वर्षानंतर आज संतोष टेंगले स्वतःहून तुळजापूर पोलिस ठाण्यात हजर होऊन शरण आले. 

तुळजाभवानीमातेच्या यात्रा उत्सवासाठी राज्य सरकारच्या वतीने दिलेल्या अनुदानातून भाविकांना सुविधा पुरवणे अपेक्षित असताना तत्कालीन नगराध्यक्ष अर्चना गंगणेसह मुख्याधिकारी यांनी संगनमताने 1 कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 28 मार्च 2017 रोजी तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून संतोष टेंगले फरार होते.

Tags : Solapur, Fraud,  tuljapur, yatra, money