Tue, Jul 16, 2019 09:56होमपेज › Solapur › वृद्धाच्या फसवणूकप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

वृद्धाच्या फसवणूकप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:39PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

तोतया व्यक्‍तीला उभे करून वृद्धाची फसवणूक करणार्‍या पाचजणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करबसय्या पंचय्या हिरेमठ, सुनील फकीरप्पा बुरा, पद्मनाभन निवृत्ती झिंबल, संतोष गोविंद स्वामी, अनिल विठ्ठल शिंगोडे व तोतया व्यक्‍ती  अशी गुन्हा  दाखल  झालेल्यांची  नावे  आहेत. याबाबत अशोक पंडितराव कासार (वय 65, रा. मंत्री चंडक कॉम्प्लेक्स, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

जुलै ते ऑगस्ट 2017 या कालावधीत करबसय्या हिरेमठ व त्याच्या साथीदारांनी सहायक दुय्यम निबंधक उत्तर सोलापूर यांच्या कार्यालयात अशोक कासार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जागी तोतया व्यक्‍तीस उभे करून खोटी कागदपत्रे तयार करून कासार यांच्या नावावर असलेली व्यंकटेश नगरमधील बिनशेती खुला प्लॉट जुना सर्व्हे नं. 164/2 नवीन सर्व्हे नं. 154/2 मधील प्लॉट नं. 45,104,51 चौमी क्षेत्र ही जागा खरेदी करून घेतली. त्यानंतर हिरेमठ याने एक महिन्यानंतर ही जागा राकेश श्रीनिवास अंबाल यास विक्री करून कासार यांची फसवणूक केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक थेटे तपास करीत आहेत.
मारहाण करून हात फ्रॅक्‍चर करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल गाडी मागे घेण्याच्या कारणावरुन तरुणास मारहाण करून हात फ्रॅक्‍चर करणार्‍याविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज ईश्‍वर गायकवाड (वय 32, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून अनिल सरवदे (वय 35, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3  जानेवारी   रोजी पाचच्या सुमारास  मार्केट यार्डसमोरील रिक्षा स्टॉपवर प्रवासी घेताना मेघराज गायकवाड यास माझ्या गाडीचा नंबर आहे, तू तुझी गाडी मागे घे असे म्हणून अनिल सरवदे याने मारहाण करून जखमी केले. यामध्ये गायकवाड याचा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कांबळे तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.