होमपेज › Solapur › माजी आमदार रवी पाटील यांचे हॉटेलाचे बांधकाम बेकायदेशीरच

माजी आमदार रवी पाटील यांचे हॉटेलाचे बांधकाम बेकायदेशीरच

Published On: Aug 20 2018 2:54PM | Last Updated: Aug 20 2018 2:53PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापुरातील सात रस्ता परिसरात बांधण्यात येत असलेले इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांचे हॉटेल अनधिकृत असल्याचा वरीष्ट डिव्हिजनल  न्यायालयाने दिलेला निकाल योग्य असल्याचे सांगत जिल्हा व सत्र न्यायालयाने पाटील यांचा अपील अर्ज फेटाळला. त्यामुळे आता या हॉटेलचे बांधकाम पाडण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
याबाबत महापलिकेचे विधी सल्लागार सोनटक्के म्हणाले की, ‘‘सात रस्ता येथे रवी पाटील यांनी बांधलेले हॉटेल महामार्गाला अडथळा ठरणारा होते. शिवाय त्याचे बांधकामही अधिकृत नकाशानुसार केले नाही. त्यामुळे त्याचा काही भाग पाडून टाकण्याची नोटीस तत्कालिन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रवी पाटील यांना बजावली होती. मात्र, त्या नोटीशीला स्थगिती मिळावी यासाठी  रवी पाटील यांनी  न्यायालयात धाव घेतली होती.  थेही सिनिअर डिव्हिजन कोर्टाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याचे नाकारत महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे रवी पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. दोन्ही बाजूची सुनावनी  झाल्यानंतर जिल्हा न्यायलयाने याबाबत सिनिअर डिव्हिजम न्यायालयाने दिलेला निकाल बरोबर असून त्यात बदल केला जाणार नाही असा आदेश दिला. 

या निकालामुळे आता महापालिकेच्या नोटीशीनुसार हॉटेलचा बेकायदेशीर भाग पाडणे किंवा उच्च न्यायालयात अपील दाखल करणे हे दोन मार्ग रवी पाटील यांच्याकडे राहिले आहेत. अन्यथा महापालिकेला त्यांचे हॉटेल पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.