Mon, Apr 22, 2019 02:19होमपेज › Solapur › विजयदादांच्या दूरदृष्टिमुळेच विकासकामे :  देशमुख

विजयदादांच्या दूरदृष्टिमुळेच विकासकामे :  देशमुख

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 9:11PMअकलूज : तालुका प्रतिनिधी

शेतकरी हा शेती अर्थव्यवस्थेवर अवलंबून होता. सहकारमहर्षींनी शेतीबरोबर कृषी व औद्योगिकतेची सांगड घातली आणि शेतीपूरक व्यवसायाची निर्मिती केली. याच विचारांचा वारसा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतला. यामुळेच आज माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामे झाली आहेत, असे मत माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

शंकरनगर - अकलूज येथील उदय सभागृहात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार  विजयसिंह मोहिते-पाटील  यांच्या  स्थानिक  विकास  निधीतून माण, खटाव, माढा व पंढरपूर तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या खुली व्यायामशाळा, एसटी निवारा शेड व हायमास्ट पोल मंजुरीचे पत्र खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आयोजित समारंभात देशमुख बोलत होते.

यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, हरिदास रणदिवे, डॉ. संदीप पोळ, श्रीराम पाटील, नरळे, मनोज पोळ, सिद्धार्थ हुलगे, रणजितसिंह देशमुख, बाळासाहेब सावंत, युवराज सूर्यवंशी यांच्यासह माण, खटाव, पंढरपूर व माढा तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी  माण तालुक्यातील   गावांना  ओपन  जीम,  एस.टी. पिकअप शेड,  हायमास्ट  दिवे, खटाव  तालुक्यातील  गावांना  ओपन  जीम,  ठिकाणी  एसटी निवारा,   गावात हायमास्ट  दिवे, माढा व पंढरपूर तालुक्यातील  गावांना खुली व्यायामशाळा मंजूर करण्यात आली. माण तालुक्यात ओपन जीम मोही,  मलवडी, राणंद, दहिवडी,  बिदाल,  महिमानगड,  म्हसवड,  देवापूर,  येळेवाडी,  आंधळी,  कुकुडवाड,  बिजवडी,  पिंपरी,  पिंगळी खुर्द, गोंदवले बु., एस.टी  पिकअप शेड बागलाचीवाडी,  मासाळवाडी,  जांभूळणी, तर पिंगळी  खुर्द,  श्रीपालवन,  वडगाव,  धामणी,  शेवरी, तुपेवाडी,  ढाकणी,  पिंगळी  बु., संभूखेड,  शेनवडी,  बोराटवाडी,  विरळी,  गंगोती, स्वरूपखानवाडी,  कासारवाडी याठिकाणी हायमास्ट  दिवे बसविण्यात येणार आहेत. खटाव  तालुक्यात हायमास्ट  दिवा अंबवडे, वाकेश्‍वर,  त्रिमली, कळंबी,  वडी,  धोंडेवाडी,   पिंपरी,  कातरखटाव,  वडूज, निमसोड,  निमसोड, ओपन  जीम  वडूज,  सिद्धेश्‍वर  कुरोली,  मायणी,  गुरसाळे,  औंध,  चितळी,  तडवळे,  मांडवे तर कान्हरवाडी येथे एसटी पिकअप शेड बसविण्यात येणार आहे.तर माढा तालुक्यातील वरवडे येथे तर पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे खुली व्यायामशाळा बसविण्यात येणार आहे.