Thu, Jun 27, 2019 09:48होमपेज › Solapur › माजी सभापती दिलीप मानेंसह अन्य माजी संचालकांचे अर्ज मंजूर

माजी सभापती दिलीप मानेंसह अन्य माजी संचालकांचे अर्ज मंजूर

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:10PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच आता छाननीत नामंजूर झालेले माजी सभापती दिलीप माने यांच्यासह अन्य माजी संचालकांचे अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडील अपिलात मंजूर करण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी माजी सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, अविनाश मार्तंडे, सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते या माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, बाजार समितीची थकबाकी असल्यामुळे हे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले होते. याविरोधात दिलीप  माने यांच्यासह सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या या निर्णयामुळे दोन माजी सभापती व दोन संचालक यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.