Mon, Mar 25, 2019 09:47होमपेज › Solapur › टेंभुर्णी येथे विदेशी दारू जप्त

टेंभुर्णी येथे विदेशी दारू जप्त

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:05PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

शहरातील जुन्या महामार्गावरील हॉटेल जगदंबा येथे टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून 51 हजार 227 रुपयांची विदेशी दारू व बीअर जप्त करून एकास अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 12.30 वाजता करण्यात आली. 

टेंभुर्णीतील जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जगदंबा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या दारूबंदी आदेशाचे उल्लंघन करून विहित अंतराची मर्यादा न पाळता राजरोस दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळल्याने टेंभुर्णी पोलिसांनी करमाळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी व टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पो.नि. आनंद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पी. के. मस्के, पो. हे. कॉ.बिरुदेव पारेकर,पो.ना. दत्तात्रय वजाळे, पो.ना. सोपान बोधवळ व पो.कॉ. भोसले या डी.बी.पथकातील पोलिसांनी शनिवारी रात्री 12.30 वा. जगदंबा हॉटेलवर छापा टाकून बेकायदेशीरपणे साठा करून विदेशी दारू व बिअर विक्री करणार्‍या विनोद पंढरीनाथ वाघमारे (वय-27,रा. टेंभुर्णी) यास 51 हजार 227 रुपये किमतीच्या दारू साठ्यासाह रंगेहाथ पकडले.

त्याच्यावर पोना सोपान चत्रभुज बोधवळ यांच्या फिर्यादीवरून परवानगी नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या दारूबंदी अनुषंगाने विहित अंतराच्या मर्यादेमध्ये दारूसाठा करुन तो विक्री करीत न्यायालयाच्या आदेशाचे  उल्लंघन केले म्हणून कलम 188 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोनी आनंद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बिरुदेव पारेकर करीत आहेत.