Tue, Mar 26, 2019 22:29होमपेज › Solapur › दोन वर्षांपासून मिळेना एकात्मिक बालविकास योजनेला अधिकारी

दोन वर्षांपासून मिळेना एकात्मिक बालविकास योजनेला अधिकारी

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 8:48PMमंगळवेढा : प्रा सचिन इंगळे 

एकात्मिक बालविकास प्रकल्पा अंतर्गत चालवत असलेल्या तालुक्याच्या अंगणवाड्या निवारा नसल्याने उघड्यावर आल्या आहेत प्रशासकीय पातळीवर  विभागामध्ये कुणी वाली उरला नाही कारण तालुक्यासाठी आवश्यक पूर्ण वेळ बालविकास प्रकल्प अधिकारी दोन वर्षांपासून मिळत नाही यावर तालुक्यात प्रचंड नाराजी आहे.  

सध्या हा विभाग पदभार म्हणून पंचायत समितीचे अधिकारी पाहतात. त्यांचा कारभार पुष्कळ आहे. त्यात हे काम त्यामुळे न्यायाची भूमिका होत नाही. 

एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या आखत्यारित तालुक्यात 264 बालवाड्या  असून त्यामध्ये 212 मोठ्या तर 52 मिनी अंगणवाड्या आहेत. तालुक्यातील बालकाच्या सर्व्हेनुसार 8904 पट 7484 असून प्रत्यक्षात उपस्थिती 5508 इतकी आहे. सध्या तालुक्यातील 160 अंगणवाड्यांना इमारत असून 52 अंगणवाड्यांना अजून इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना या मुलांना पाऊस, ऊन, वारा यांचा सामना करत शिकवावे लागत आहे.

याशिवाय वाडीवस्तीवरील बालकांना घराजवळ शाळा व्हावी म्हणून तालुक्यातील वाडीवस्तीवर सुरू केलेल्या 52 पैकी 51 अंगणवाड्यात निवार्‍याचा अभाव आहे. यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही.चिमुकल्याच्या आयुष्याशी खेळ सुरु आहेत. एका बाजुला माध्यमिक शाळेत विद्यार्थी टिकावा म्हणून घरातून शाळेला वाहनातून आणले जाते पण या अल्पवयीन बालकांशीच्या पुढील शैक्षनिक भवितव्याबाबत या कार्यालयाच्या माध्यमातून खेळ खेळला जात आहे. गरोदर मातांना योग्य सकस आहारदेखील या अंगणवाड्यातून दिला जातो पण इमारत नसलेल्या ठिकाणी आहार उघड्यावर ठेवावा लागतो तर बालकांचा पोषण आहारदेखील उघड्यावरच शिजवून द्यावा लागतो. याशिवाय  मुलाना अंगणवाडी मध्ये उघड्यावर बसावे लागते. तिथेच पोषण आहार खावा लागतो. त्यामुळे साथीच्या आजाराला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. पालकांना आपल्या मुलांना महागड्या इंग्रजी शाळेत पाठवायला परिस्थिती नसते म्हणून जे आहे ते पदरात पाडू अशा मानसिकतेत राहत आहेत.  तसेच बालकांची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर भरण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांनी अप्रशीक्षीत अंगणवाडी सेविकांवर सदरची माहिती भरण्यासाठी तंबी दिली. 

यामुळेच तोकड्या मानधनावर काम करणार्‍या अंगणवाडी सेविकाना ही माहिती भरण्यासाठी नेटकॅफेचा आधार घ्यावा लागला आणि त्यासाठी पैसे मोजावे लागले आहेत. वास्तविक पाहता हे काम या खात्याने त्या त्या गावातील ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकाकडून घेणे अपेक्षित होते. मात्र हे सगळे बिनबोभाट सुरू असून या खात्याला जबाबदार अधिकारी आवश्यक असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

2 आमदार तरी ही 2 वर्षापासून अधिकारी मिळेना
माझी कन्या भाग्यश्री योजना,गरोदर माता पोषण आहार, कुपोषण मुक्ती, अंगणवाडी,अशा मह्तत्वच्या विभागाला मुुुख्य आधिकारी नाही या बाबतीत तालुक्याच्या नशीबात लाभलेल्या दोन आमदाराना एक अधिकारी आणण्यात यश येत नाही एक आमदार सत्तेच्या दारात आहेत तर एक विरोधी गटात मात्र दोंघांचे ही प्रयत्न का यशस्वी होत नाहित हा प्रश्‍नं अनुत्तरीत आहे.