Mon, Jul 22, 2019 04:41होमपेज › Solapur › माळीनगर येथे तुकोबारायांचे पहिले उभे रिंगण

माळीनगर येथे तुकोबारायांचे पहिले उभे रिंगण

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:07PMमाळीनगर : गोपाळ लावंड

संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांची पालखी अकलूज मुक्‍कामानंतर उद्या  गुरूवार  दि 19 जुलै रोजी  माळीनगर मध्ये सकाळी 8 वाजता येत असून संत तुकाराम महाराज पालखीचे  उभे  रिंगण पाहण्यासाठी लाखो वैष्णव माळीनगर नगरीत जमतील हा सोहळा   पाहण्यासाठी माळीनगर व परिसरात उत्सुकता लागली आहे.

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व ग्रामपंचायत माळीनगर व समस्त माळीनगर वासीयांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.  मॉडेल हायस्कूलच्या भव्य मैदानात वारकर्‍यांची विसाव्यासाठी तयारी केली आहे. घरोघरी  वारकर्‍यांना प्रसाद भोजनाची  सोय केली आहे. सासवड माळी शुगर फॅक्टरी तर्फे 5000 वारकर्‍यांना मिष्ठान्‍न प्रसाद भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच महात्मा फुले पतसंस्था माळीनगर यांच्यावतीने देखील 2000 वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्यावतीने  शुद्ध  पाण्याची व्यवस्था, मोफत आरोग्य सुविधा , सुरक्षा विभागातर्फे  चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जनसेवा संघटनेच्यावतीने वारकर्‍यांना  भोजन  व्यवस्था केली आहे.  परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वारकर्‍यांना मोफत अनेक सुविधा पुरवण्यात येतात. तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त गावात मोठ्या जत्रेचे स्वरूप येते. भक्तांना पिण्याचे पाणी, मोफत आरोग्य सुविधा, तातडीची मदत यासाठी प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगरचे कर्मचारी सज्ज झाले आहेत.