सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे हातमाग कारखान्याला भीषण आग लागली.शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
मल्लप्पा निरोळी यांच्या मालकीच्या हातमाग कारखान्या लागलेल्या आगीत अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत संसारोपयोगी वस्तु, माग जळुन खाक झाले. आगीची घटना समजताच आग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल सात तास लागले.