Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Solapur › विद्यापीठाला जुलैपासून लागणार आर्थिक शिस्त

विद्यापीठाला जुलैपासून लागणार आर्थिक शिस्त

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 8:51PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाचे बजेट सादर करणे, बजेटला मंजुरी देणे, झालेल्या कामाची बिले मंजूर करणे यासह विद्यापीठाच्या आर्थिक विषयांना आता लवकरच शिस्त लागणार असून 17 जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 6 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 

आरक्षणामध्ये सर्वच मागास प्रवर्गाला जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीत पदवीधर, संस्थाचालक, प्राध्यापक, प्राचार्य आदी मतदारसंघातून प्रत्येकी 1 उमेदवार उभा राहणार आहे. यांना एकूण 70 सिनेट सदस्य मतदान करून निवडून देतील. यातील निवडून आलेले एकूण 8 सदस्य व्यवस्थापन परिषदेवर जातील. या व्यवस्थापन परिषदेच्या उमेदवारांनी 6 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर अर्ज वैध, अवैध, अर्ज छाननी आदी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर 17 जुलै 2018 रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही निवडणूक ज्वर...

सोलापूर जिल्ह्यात एकीकडे बाजार समितीची निवडणूक लागली आहे. त्यामध्ये राजकीय क्षेत्र आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच विद्यापीठाच्याव्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातही निवडणूक ज्वर आला असून पदवीधर, प्राचार्य, संस्थाचालक आदी मतदारसंघात निवडणुकीच्यादृष्टीने मोठ्या हालचालींना वेग आला आहे.