Wed, Nov 14, 2018 17:34होमपेज › Solapur › पशुसंवर्धन विभागातील रिक्‍त पदे भरावीत

पशुसंवर्धन विभागातील रिक्‍त पदे भरावीत

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:42PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा  परिषद पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकार्‍यांची 134 पदे मंजूर असून यापैकी 42 पदे रिक्‍त असल्याने पशुवैद्यकीय सेवा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रिक्‍त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी आ. सिध्दाराम म्हेत्रे व जि.प.कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्‍लिकार्जुन पाटील यांनी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे समक्ष भेटून केली.

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असून कृषी क्षेत्रात अनेक शेतकर्‍यांचे उपजिवीकेचे पूरक साधन पशुसंपत्ती आहे. केंद्र व राज्य शासनाकडून घेण्यात येणार्‍या योजनेतून पूरक व्यवसायात वाढ होत आहे. मात्र डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे जनावरांच्या आरोग्य सेवेत अडचणी निर्माण होत आहेत. अक्‍कलकोट तालुक्यातही हीच परिस्थिती असून रिक्‍त असणारी पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ना. जानकर यांच्याकडे यावेळी करण्यात आली.