Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Solapur ›

शेवते येथे दोन समाजात मारामारी
 

शेवते येथे दोन समाजात मारामारी
 

Published On: Apr 04 2018 11:58PM | Last Updated: Apr 04 2018 11:42PMभोसे (क.), वार्ताहर

पंढरपूर तालुक्यातील शेवते येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर दोन समाजातील मारामारीत झाले असून यात तीन युवक जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शेवते येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूकीच्या दरम्यान यलमार आणि वडार समाजातील युवकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यकर्मातही पुन्हा या दोन समाजातील युवकांमध्ये बाचाबाची झाली होती.

त्याचे रुपांतर काल (दि. 3) रात्री आणि आज (दि. 4) सकाळी भांडणात होऊन वडार समाजातील युवकांनी यलमार समाजाच्या चार ते पाच लोकांना बेदम मारहाण केली. यात माजी उपसरपंच विष्णू विटेकर, सुभाष विटेकर आणखी एक युवक असे तिघे जबर जखमी झाले आहेत. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत निषेध व्यक्त केला आहे. आज सकाळपासूनच यलमार समाजातील युवक मोठ्या संख्येने बसस्थानक चौकात थांबून होते, तर वडार समाजातील महिला गावात थांबून होत्या. याबाबत करकंब पोलिसांना माहिती मिळताच सपोनि दीपक पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होतेे. गावातील वातावरण सध्या  तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.

 

Tags :  Fights Between Two Community, Community,  Sheaves, Solapur