Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Solapur › महिला सरपंचाच्या मुलाकडून हवालदारास सळईने मारहाण 

महिला सरपंचाच्या मुलाकडून हवालदारास सळईने मारहाण 

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 8:26PMसोलापूर : प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ग्रामपंचायत कार्यालयात पत्नीसोबत तीन अपत्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी गेलेल्या एका पोलिस हवालदारास महिला सरपंचाच्या मुलासह तिघांनी सळईने मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

यात गंभीर जखमी झाल्याने भाऊ नंदकुमार बिराजदारने जखमी पोलिस हवालदारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. तम्मा गणपती बिराजदार (वय 50, रा. स्वामी विवेकानंदनगर, सोलापूर) असे जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे. या मारहाणीत डोक्याच्या मागील बाजूस, पाठीस, पायास जबर मारहाण झाल्याचे भाऊ नंदू बिराजदारने सांगितले. जखमी तम्मा बिराजदार यांची पत्नी शशिकला या महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी नुकतेच पोलिस पाटील झालेल्या श्रीमंत बिराजदार यास तीन अपत्ये असून त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यासाठी धोत्री ग्रामपंचायतला अर्ज केला होता. तो घेण्यासाठी शशिकला यांना रविवारी बोलावले होते. तम्मा बिराजदार यांना रविवारची सुटी असल्याने तेदेखील पत्नीबरोबर धोत्री ग्रामपंचायत कार्यालयात गेले. त्याठिकाणी सरपंच शांता नारायण व्हटकर यांचा मुलगा प्रभाकर व्हटकरसह तीनजणांनी मिळून तू ग्रामपंचायत ऑफिसमध्ये का आला म्हणून तम्मा बिराजदार यास सळई, काठीने मारहाण केली. त्यास उपचारासाठी भाऊ नंदू बिराजदार यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलेआहे.