Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Solapur › 50 लाखांची फसवणूक; शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

50 लाखांची फसवणूक; शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 11:09PMसोलापूर : प्रतिनिधी

50 लाखांच्या फसवणुकीच्या नैराश्यामधून शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी अक्‍कलकोट तालुक्यातील सांगवी (बु.) येथे घडली.

संभाजी दत्तात्रय भोसले (वय 50, रा. सांगवी बु.) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचे नाव असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाजी भोसले यांचे विजय शिरसठ हे मित्र असून शिरसठ यांनी भोसले  यांना  5 कोटी  रुपयांचा प्रोजेक्ट करून देतो म्हणून 50 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे भोसले हे तणावात होते. या त्यामुळे भोसले यांनी गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले.  त्यांना त्रास होऊ लागल्यावर त्यांना उपचारासाठी सागर भोसले याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.