Thu, Apr 25, 2019 15:40होमपेज › Solapur › शेतकर्‍यांना कष्टाचा दाम मिळालाच पाहिजे : विजयसिंह मोहिते-पाटील

शेतकर्‍यांना कष्टाचा दाम मिळालाच पाहिजे : विजयसिंह मोहिते-पाटील

Published On: Feb 11 2018 10:40PM | Last Updated: Feb 11 2018 8:50PM
नातेपुते : वार्ताहर 
बाजारभाव व हमीभाव यामध्ये मोेठी तफावत निर्माण झाली की अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र चालू करून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सहकार  महर्षींनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार   शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचा दाम मिळालाच पाहिजे या तत्वाने बाजार समितीचे काम चालू असल्याचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी 
सांगितले.

 सहकार महर्षी कै. शंकरराव मोोहिते-पाटील यांच्या 39 व्या पुण्यतिथी निमित्त अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नातेपुते मार्केट यार्डात सहकार महर्षि शंकरराव मोेहिते-पाटील नवीन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील होते. प्रथम सहकार महर्षी व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अ‍ॅड भानुदास राऊत व माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अकलूज कृ. उ. बा. समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 

खा. मोहिते-पाटील यांनी सहकार महर्षि यांच्या पुण्यतिथी निमित्त नातेपुते येथे व्यापारी गाळे बांधण्याचा एक चांगला उपक्रम घेऊन त्याचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी धैर्यशिल मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, डॉ. एम. पी. मोरे, अ‍ॅड. डी. एन. काळे, आप्पा भांड, पंढरीशेठ दाते, बाजार समितीचे उपसभापती मामाासाहेब पांढरे, सचिव राजेन्द्र काकडे, सहसचिव आडगळे, पुष्पलता पाटील व परिसरातील सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन औदुंबर बुधावले यांनी केले तर आभार बाहुबली चंकेश्‍वरा यांनी मानले.