Wed, Apr 24, 2019 07:51होमपेज › Solapur › उजनीच्या प्रकटन दुरुस्तीसाठी मोर्चा

उजनीच्या प्रकटन दुरुस्तीसाठी मोर्चा

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 25 2018 10:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासन शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करीत आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने  उन्हाळी हंगामातील प्रकटनामध्ये दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शुक्रवारी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांनी पंढरपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. येथील छत्रपती शिवाजी चौकातून हजारो शेतकर्‍यांसह तहसील कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला होता. शिवाजी चौकातील अश्‍वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली. स्टेशनरोडमार्गे तहसील कार्यालयावर रखरखत्या उन्हात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर  झालेनंतर झाले. प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या प्रकटीकरणातून भीमानदीचे स्त्रोत वगळलेनंतर ते दुरुस्त करून प्रकटीकरणामध्ये भीमानदीचा 
समावेश करून फेर प्रकटीकरण काढण्यात यावे. उन्हाळी हंगामासाठी भीमानदीस पाणी सोडण्यात यावे, आठ तास सलग वीज पुरवठा करण्यात यावा, भीमानदीवरील बंधार्‍यांचे दरवाजे बसविण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
     
यावेळी कल्याणराव काळे, जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी कालवा व नदीद्वारे योग्य प्रमाणात पाणी सोडून शेतकर्‍यांना समान  न्याय देण्यात यावा अशी मागणी करून कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजनेसाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा असे  आवाहन केले.  यावेळी दिनकर चव्हाण, मोहन अनपट, सुधाकर कवडे, नितीन पवार यांची भाषणे झाली.  यावेळी नारायण मोरे, जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे, सिताराम शुगर्सचे कार्यकारी संचालक समाधान काळे,  श्रमिक मुक्‍ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, महादेव देठे, शहाजी साळुंखे, नगरसेवक डी.राज सर्वगोड, प्रशांत शिंदे, महादेव भालेराव, महादेव धोत्रे,  धनंजय कोताळकर, किरण घाडगे,  अ‍ॅड.राजेश भादुले, राजू उराडे, सुधीर धुमाळ, नागेश फाटे, मोहन नागटिळक, अ‍ॅड. तानाजी सरदार, रायाप्पा हळणवर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.