Fri, May 24, 2019 09:14होमपेज › Solapur › काँग्रेसमुक्‍त भारत हे  भाजपचे दिवा स्वप्न: शिंदे

काँग्रेसमुक्‍त भारत हे  भाजपचे दिवा स्वप्न: शिंदे

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:36PMपंढरपूर : प्रतिनिधी

आश्‍वासनांच्या खैरात करून  ग्रामीण जनतेचा फसवून सत्ता मिळविलेल्या भाजपने जनतेची घोर निराशा केली आहे़  येत्या निवडणुकीत मतदार भाजपला त्यांची जागा दाखवून देतील़ त्यामुळे काँग्रेस विरहित भारत हे भाजपचे दिवा स्वप्न ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सरकोली (ता़ पंढरपूर) येथे आ़ भारत भालके यांचा नागरी सत्कार, विविध विकासकामांचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ़ पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ़ प्रणिती शिंदे, आ़ दत्तात्रय सावंत, कल्याणराव काळे, प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रतनचंद बँकेचे चेअरमन राहुल शहा, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, दामाजीचे माजी चेअरमन नंदकुमार पवार,  जेष्ठ ग्रामीण साहित्य डॉ. द. ता. भोसले उपस्थित होते़ यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील  म्हणालेकी,  स्वातंत्र्यानंतर शेतकर्‍यांना व सामान्य जनतेला वेठीस धरणारे हे पहिले सरकार असल्याचे सांगून ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणुकीतसुद्धा पंतप्रधान प्रचारासाठी येतील काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला़. 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केवळ ऑनलाईनवर चालणारे सरकार कर्जमाफीबाबत ऑफलाईन झाले आहे़ भाजपचे आमदारच बलात्काराच्या गुन्ह्यात आढळून आल्याने देशातील असुरक्षितता वाढल्याचे सांगितले़ शेतकर्‍यांच्या गळ्यात कर्जमाफीच्या पाट्या देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी , आ़ भालके यांनी जनतेची बांधिलकी कायम ठेवल्याचे सांगत अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी काढलेल्या कर्जाचा बोजा महाराष्ट्रवर सरकारवर लादल्याचे सांगितले़. 

 वमान खरेदी प्रकरणात काँग्रेस सरकारच्या काळात 580 कोटी रुपयांस खरेदी केलेले विमान 1670 कोटी रुपयांपर्यंत वाढवून आजवर देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार सरकारने केल्याचे सांगितले़. सत्काराला उत्तर देताना आ़ भारत भालके यांनी म्हणाले, मातीतला सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून गावाचे ऋण विसरणार नाही़. सरकारने सभागृहात दिलेली आश्वासने पाळली नाहीत़ साखर उद्योग मोडीत काढून पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे़. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणीपुरवठा योजनेत राजकारण केले जात असून तो प्रश्‍न तडीस लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले़. 

यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, सरपंच सौ. प्रतिभा  पांडुरंग भोसले, उपसरपंच नागनाथ जगताप, शिवाजीराव काळुंगे, चेतन नरोटे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़.