Fri, Mar 22, 2019 23:52होमपेज › Solapur › शेतकर्‍यांचे साडेतीनशे कोटी थकले

शेतकर्‍यांचे साडेतीनशे कोटी थकले

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 11:14PMसोलापूर :  प्रतिनिधी  

सोलापूर जिल्ह्यात चालू गळीत हंगामात 1 कोटी 69 लाख टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, सहकार कायद्यानुसार एफआरपीची रक्‍कम 14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करणे अपेक्षित असताना सोलापूर जिल्ह्यातील 25 कारखान्यांनी ही रक्‍कम अद्याप जमा केेलेली नाही. त्यामुळे तत्काळ पैसे शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करावेत, अशी मागणी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

एफआरपीची जवळपास 356 कोटी रुपये साखर कारखानदारांकडे थकले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणी जाणवत आहेत. शेतकर्‍यांची अनेक कामे अडून पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणि शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन एफआरपीची रक्‍कम तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी वसंत गायकवाड, उमाशंकर पाटील, पोपट साठे, राजेंद्र लांडे, नरेंद्र पाटील, अब्दुल मकानदार, इक्बाल मुजावर, विजय भालेराव, चांद यादगिरी, चंद्रशेखर मानशेट्टी, विकास अरवत, संगप्पा आळगी, बाबुशा चव्हाण, शिवप्पा रमणशेट्टी, रेवणप्पा बनसोेडे, गजानन घोडके, नरहरी वारे, वैभव कुलकर्णी, महामूद पटेल, उमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.