होमपेज › Solapur › सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल

Published On: Jan 02 2018 8:46PM | Last Updated: Jan 02 2018 8:46PM

बुकमार्क करा
सोलापूर : पुढारी ऑनलाईन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांची गाडी आडविणे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना महागात पडले आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयातील उपचाराचे दर वाढविल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गाडी अडवून आंदोलन केले होते. यादरम्यान एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला होता. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ( कलम १४३) बेकायदेशीर जमाव गोळा करणे, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे (कलम ३५३ आणि ३३२ ) तसेच परवानगीविना रस्ता रोखणे असे आमदार शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.